अ‍ॅपशहर

ड्रायव्हरच्या मुलाच्या लग्नाला सलमानची हजेरी

बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानच्या मोठेपणाचा त्याच्या ड्रायव्हरने सुखद अनुभव घेतला आहे. केवळ एका शब्दावर सलमान मुलाच्या लग्नाला उपस्थित राहिल्यानं सलमानच्या ड्रायव्हरला आकाश ठेंगण झालं आहे.

Maharashtra Times 25 Jan 2017, 3:44 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम salman khan snapped at a wedding
ड्रायव्हरच्या मुलाच्या लग्नाला सलमानची हजेरी


बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान याच्या मोठेपणाचा त्याच्या ड्रायव्हरने सुखद अनुभव घेतला आहे. केवळ एका शब्दावर सलमान मुलाच्या लग्नाला उपस्थित राहिल्यानं सलमानच्या ड्रायव्हरला आकाश ठेंगणं झालं आहे.

सलमानच्या ड्रायव्हरच्या मुलाचं लग्न होतं. ड्रायव्हरनं सलमानला या लग्नाला येण्याचं आमंत्रणही दिलं होतं. पण सलमानच्या बिझी शेड्युलमुळे तो लग्नाला येईलच याची शाश्वती त्याला नव्हती. मात्र घडले उलटेच. सलमान ड्रायव्हरच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहिलाच पण एकटा नाही तर सहकुटूंब. त्याच्यासोबत त्याची बहिण अर्पिता आणि अलविराही उपस्थित होत्या. याशिवाय संगीतकार वाजीद खान, सूरज पांचोली आणि हिमेश रेशमिया हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. सलमानने वधू-वरांना आशीर्वाद तर दिलेच शिवाय नवदाम्पत्यांसोबत फोटोही काढले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज