अ‍ॅपशहर

'माझ्या मुलुंडच्या टेलरकडे, मुलीच्या लग्नातल्या मेंहदीवाल्याकडे जाऊन ईडीची चौकशी, कितना पैसा दिया?'

गेली अनेक दिवस राज्यात ज्या पत्रकार परिषदेची चर्चा सुरु होती, ती शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद शिवसेना भवनात संपन्न झाली आहे. अपेक्षेप्रमाणे संजय राऊत यांनी भाजप, किरीट सोमय्या आणि ईडीवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 15 Feb 2022, 6:30 pm
मुंबई : गेली अनेक दिवस राज्यात ज्या पत्रकार परिषदेची चर्चा सुरु होती, ती शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) शिवसेना भवनात संपन्न झाली आहे. अपेक्षेप्रमाणे संजय राऊत यांनी भाजप, किरीट सोमय्या आणि ईडीवर आरोपांच्या फैरी झाडल्या. माझ्या मुलुंडच्या टेलरकडे तसंच मुलीच्या लग्नातल्या मेंहदीवाल्याकडे जाऊन ईडीने चौकशी केली, असं संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगिलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shivsena Sanjay Raut 2
संजय राऊत (खासदार, शिवसेना)


'मुलीच्या लग्नातल्या मेंहदीवाल्याकडे जाऊन ईडी चौकशी करतंय'

आम्ही सरकारमधून बाहेर पडावं म्हणून भाजपचे नेते मला तीन वेळा भेटले. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचा आमचा प्लॅन झालाय. एककर राष्ट्रपती राजवट लागू करु किंवा आमदार फोडू, पण ठाकरे सरकार पाडू, असं त्यांनी मला सांगितलं. पण मी ही त्यांना बाळासाहेबांचा मावळा असल्याचं सांगत 'झुकूंगा नहीं' सांगितलं. तेव्हापासून माझ्यावर, आमच्या कुटुंबियांवर, मित्र परिवारावर ईडीच्या धाडी पडतायत, चौकशी सुरु आहे. एवढंच काय, माझ्या मुलीत्या लग्नात जो मेहंदीवाला होता, त्याच्याकडे जाऊनही ईडीने चौकशी केली. मुलुंडच्या माझ्या टेलरवाल्याकडेही जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याचं राऊतांनी सांगितलं.

'मला जेलमध्ये टाका, पण तुम्हीही माझ्याबरोबर असाल!'

मुलीच्या लग्नाची चौकशी सुरु आहे. मेहंदीवाल्यांकडे गेले, नेलपॉलिश करणाऱ्यांकडे गेले आणि विचारलं 'कितना पैसा दिया?' आम्ही म्हणतो, घरात लग्न आहे, घरात यायचं नाही. पण आमच्या घरात अशा पद्धतीने तुम्ही शिरता. मुलांच्या घरात, दुकानात, कामाच्या ठिकाणी शिरुन दादागिरी करतायत. मी सांगतो, मला जेलमध्ये टाकणार आहात? टाका. मी जायला तयार आहे. पण माझ्यासोबत तुम्हीही असाल. सगळे", असंही राऊत म्हणाले.

'माझ्या नातेवाईकांना ईडीच्या धमक्या'

"माझे २० वर्षांचे बँकेचे स्टेटमेंट ईडीने मला मागितले. मी ही दिले. माझं गाव अलिबाग आहे. माझी जमीन अलिबागलाच असेल. ती थोडी मॉरिशसला असेल. भाजपाच्या नेत्यांप्रमाणे लंडन-अमेरिकेत माझ्या मालमत्ता नाहीत. माझ्या ५० गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय. त्यासाठी किहीम गावातल्या नातेवाईकांच्या घरी पहाटे ४ वाजता जाऊन त्यांना उचललं जातंय.. त्यांना धमकी दिली जातीय, तुम्ही संजय राऊतांच्या विरोधात साक्ष द्या, नाहीतर तुरुंगात पाठवू... कोणत्या कायद्याने?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज