अ‍ॅपशहर

सोमय्यांचा जामीन फेटाळताच राऊतांचं ट्विट, 'बाप बेटे तुरुंगात जाणार, देशमुख मलिकांच्या शेजारी राहणार'

आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या यांना कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाच्या निर्णयानंतर फक्त ५ मिनिटांनी ट्विट करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बाप बेटे तुरुंगात जाणार असल्याचा ट्विटद्वारे पुनरुच्चार केलाय.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Apr 2022, 6:35 pm
मुंबई : आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या यांना कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर ५ मिनिटांनी ट्विट करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बाप बेटे तुरुंगात जाणार असल्याचा ट्विटद्वारे पुनरुच्चार केलाय. सोमय्या बाप बेटे तुरुंगात जाणार, अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांच्या कोठडीशेजारी सोमय्या राहणार, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sanjay Raut Slam Kirit somaiya through tweet after mumbai session court rejected somaiya pre arrested bail over INS Vikrant fund case
संजय राऊत आणि किरीट सोमय्या


संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत निधी प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आर्थिक अपहार केल्याचा आरोप केला आहे. राऊतांच्या आरोपानंतर सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आज मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावली झाली. या सुनावणीवेळी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

आग लगाने वालों का कहाँ खबर रुख हवाओं ने बदला तो खाक वो भी होंगे, असं ट्विट करताना सोमय्या बाप बेटे तुरुंगात जाणार, अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांच्या कोठडीशेजारी सोमय्या राहणार, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.



न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला

आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या यांना कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. पण मुंबई सत्र न्यायालयाने सोमय्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज