अ‍ॅपशहर

तुम्ही ठाकरे आहात, महाराष्ट्रात तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही: संजय राऊत

Raj Thackeray | मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. यासंदर्भात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना टिप्पणी केली.

Authored byरोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 May 2022, 10:46 am

हायलाइट्स:

  • गृहखाते आणि पोलीस तुमच्या रक्षणासाठी सक्षम आहेत
  • राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Raj Thackery Sanjay Raut
संजय राऊत आणि राज ठाकरे
मुंबई: तुम्ही इतकी वर्षे महाराष्ट्रात राहताय, तुम्ही ठाकरे आहात, तुम्हाला हात लावण्याची हिंमत कोणामध्ये आहे का? राज ठाकरे यांच्या केसालाही महाराष्ट्रात धक्का लागणार नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना धमकीचे पत्र आले होते. याविषयी संजय राऊत यांना विचारणा झाली असता त्यांनी ही शक्यता साफ फेटाळून लावली. महाराष्ट्रात सर्वजण सुरक्षित आहेत. तुम्हाला धोका असेल तर राज्यातील गृहखाते आणि पोलीस तुमच्या रक्षणासाठी सक्षम आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र आले होते. यावरून संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. कोणीही कोणाला हात लावत नाही. शिवसेना भवनात अशी पत्रं शेकड्याने येत असतात. महाराष्ट्र सुरक्षित आहे. महाराष्ट्रात कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. लागणार असेल तर केंद्र सरकार CISF च्या जवानांची सुरक्षा द्यायला समर्थ आहे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला. तुम्ही इतकी वर्षे महाराष्ट्रात राहत आहात, ठाकरे आहात. तुम्हाला हात लावण्याची हिंमत कोणीही करणार नाही. किंबहुना महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला हात लावण्याची हिंमत कोणीही करणार नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. त्यामुळे स्टंटबाजी बंद करा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना सुनावले.

'राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल'

राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटेल. बाळा नांदगावकरला धमकी आली, ते ठीक आहे. पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी, अशी विनंती बाळा नांदगावकर यांनी केली होती.
लेखकाबद्दल
रोहित धामणस्कर
रोहित धामणस्कर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | लोकसत्ता, झी २४ तास, टीव्ही ९ मराठीसह डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ९ वर्षांचा अनुभव | सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख