अ‍ॅपशहर

न्यायमूर्तींनी देऊ केली ‘त्या’ मुलाची फी!

एका चार वर्षीय गरीब मुलाला फी माफी देऊन प्रवेश देण्याबाबत चेंबूरमधील लोकमान्य टिळक हायस्कूलकडून सहानुभूतीपूर्वक विचार होत नसल्याचे पाहून अखेर खुद्द न्यायमूर्तींनीच फी भरण्याची तयारी दर्शवली! न्यायमूर्तींच्या या उपरोधिक टोल्याने खजिल झालेल्या शाळेच्या वकिलांनी त्या बालकाला आम्ही सोमवारी फी न घेता प्रवेश देऊ, अशी तयारी दर्शवली.

Maharashtra Times 25 Jun 2016, 3:20 am
चेंबूरच्या शाळेने अखेर प्रवेश देण्याची तयारी दर्शवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम school admission issue
न्यायमूर्तींनी देऊ केली ‘त्या’ मुलाची फी!

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

एका चार वर्षीय गरीब मुलाला फी माफी देऊन प्रवेश देण्याबाबत चेंबूरमधील लोकमान्य टिळक हायस्कूलकडून सहानुभूतीपूर्वक विचार होत नसल्याचे पाहून अखेर खुद्द न्यायमूर्तींनीच फी भरण्याची तयारी दर्शवली! न्यायमूर्तींच्या या उपरोधिक टोल्याने खजिल झालेल्या शाळेच्या वकिलांनी त्या बालकाला आम्ही सोमवारी फी न घेता प्रवेश देऊ, अशी तयारी दर्शवली.

सर्वांना शिक्षणाचा मूलभूत असूनही ३० हजार रुपये भरल्यानंतरच मुलाला ज्युनियर केजीमध्ये प्रवेश देऊ, अशी भूमिका शाळेने घेतली होती. त्यामुळे मुलाची गरीब विधवा आई रिटा कनोजिया यांनी अॅड. प्रकाश वाघ यांच्यामार्फत याचिका दाखल केली. त्यावर ३० हजार रुपयांपैकी १९ हजार ५०० रुपयांच्या बिल्डिंग डेव्हलपमेंट फंडसाठी आग्रह न धरता मुलाला प्रवेश देण्याची प्रक्रिया करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले होते. याविषयीचे वृत्त ‘म.टा.’ने १६ जून रोजी दिले होते.

शुक्रवारी हा विषय पुन्हा सुनावणीस आला तेव्हा, ‘या गरीब मातेला वीजबिल भरायलाही पैसे नसल्याने जवळपास दीड वर्षे अंधारात रहावे लागले; अखेर आपण आर्थिक मदत केल्यानंतर वीजबिल भरून पुन्हा कपडे इस्त्रीचा व्यवसाय सुरू करत तिला मुलांचे शिक्षण सुरू करता आले,’ अशी माहिती वाघ यांनी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठाला दिली. तसेच शाळेचे सुरक्षारक्षक रिटा यांना शाळेतही घेत नसून उर्वरित फी माफ करण्याची किंवा सवलत देण्याची त्यांची तयारी नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. तेव्हा शाळेने सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा, असे म्हणतानाच किती आहे तुमची फी? आम्ही देतो साडेदहा हजार रुपये, अशा शब्दांत न्या. कानडे यांनी सुनावले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज