अ‍ॅपशहर

इथे फूटपाथवरच भरते शाळा...

मुंबईतील अंधेरी परिसरात अनेक ठिकाणी आजही फूटपाथवरच शाळा भरत आहे.

सौरभ शर्मा | Maharashtra Times 15 Aug 2017, 4:17 am
मुंबई ः मुंबईत अनेक शाळा आज र्व्हच्युअल क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, एसी वर्ग यांसारख्या सोयीसुविधांनी सज्ज असल्याचे चित्र दिसत असले, तरी मुंबईतील अंधेरी परिसरात अनेक ठिकाणी आजही फूटपाथवरच शाळा भरत आहे. झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून देण्यासाठी अंधेरी परिसरात एकूण आठ ठिकाणी फूटपाथवर, सिग्नलजवळ आशा किरण ट्रस्टतर्फे हे वर्ग भरविले जात आहेत. ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता हे वर्ग भरत असून ज्ञानदानाचे मोलाचे कार्य या माध्यमातून केले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम school on footpath
इथे फूटपाथवरच भरते शाळा...


आज मुंबईत अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय शाळांनी मुहूर्तमेढ रोवली असली, तरी हजारो विद्यार्थी शिक्षणांपासून वंचित आहेत. अशी हजारो मुले मुंबईच्या रस्त्यावर हमखास पहायला मिळतात. या विद्यार्थ्यांची हित लक्षात घेता, १९९८ पासून आशा किरण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या मुलांकडून काम सुरू आहे. त्याचवेळी विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे देण्याच्या विचारातून या फुटपाथ-शाळांची उभारणी करण्यात आली. ट्रस्टमार्फत अंधेरी परिसरात लिंक रोड, स्टार बाजार, चार बंगला, आरटीओजवळ अशा एकूण आठ ठिकाणी दोन सत्रात हे वर्ग भरविले जातात. या शाळेत सध्या अडीचशे ते तीनशे विद्यार्थी धडे गिरवित आहेत. यातील अनेक सेंटरवर फळा किंवा इतर सुविधाही नाहीत. मात्र या परिस्थितीतही शिकण्याची उमेद येथील मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणविते. संस्थेतर्फे २० शिक्षक ही जबाबदारी पार पडत असून इतर १० ते १५ जण स्वयंसेवक म्हणून मुलांना शिकवित असल्याचे असल्याचे ट्रस्टचे महेश हिंगराणी यांनी सांगितले.

मुंबईकरांना मदतीचे आवाहन

ज्या मुलांना शाळेत जाता येत नाही, ते आमच्या या फुटपाथ-शाळेत येतात. त्यात प्रामुख्याने झोपडपट्टीतील मुलांचा समावेश आहे. तर काही मुले शाळेत जातात, पण ट्यूशन लावण्याची आर्थिक स्थिती नसल्याने तीही मार्गदर्शनासाठी आमच्याकडे येतात. पहिली ते दहावीपर्यंतची मुले येथे आहेत. शिक्षणासह मुलांच्या इतर कलागुणांनाही कशाप्रकारे वाव देता येईल, यासाठी आम्ही करतो. अनेक जण वह्यापुस्तकांच्या रूपात मदत करतात. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी केली जाते. या मुलांना मदत करण्यासाठी मुंबईकरांनी पुढे यावे, असे आवाहन महेश हिंगराणी यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज