अ‍ॅपशहर

‘त्या’ विद्यार्थ्यांना आजच घ्यावा लागणार प्रवेश

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या यादीतील प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी संबंधित कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यावयाचा शेवटचा दिवस आहे.

Maharashtra Times 24 Jul 2017, 4:00 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम second list student have to take admission today itself
‘त्या’ विद्यार्थ्यांना आजच घ्यावा लागणार प्रवेश

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या यादीतील प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी संबंधित कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यावयाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक विभागाकडून करण्यात आले आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील पहिली यादी उश‌िराने जाहीर केल्यानंतर शिक्षण उपसंचालक विभागाने २० जुलै रोजी जाहीर होणारी दुसरी यादी १९ जुलै रोजीच जाहीर करत विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला. या दुसऱ्या यादीतील एकूण १ लाख १७ हजार २८६ विद्यार्थ्यांपैकी ८० हजार १४१ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. दुसऱ्या यादीत एकूण १८ हजार ४८६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या यादीतील किती विद्यार्थी प्रवेश निश्चित करतात हे पाहणे औत्युक्याचे ठरेल. कारण पहिल्या यादीतील पहिल्या पसंतीक्रमाचे प्रवेश जाहीर झाल्यानंतर १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नव्हते. त्यामुळे दुसऱ्या यादीतील विद्यार्थी प्रवेश नाकारतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, दुसऱ्या यादीत शाखानिहाय प्रवेशात यंदाही कॉमर्स शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून आले आहे. दुसऱ्या यादीत जाहीर झालेल्या प्रवेशात एकूण कॉमर्स शाखेतील सर्वाधिक ४९,३१४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ सायन्स २७,७५७ आणि आर्टसच्या ६ हजार २३९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर एमसीव्हीसीच्या ८३१ विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश मिळाल्याचे दिसून आले आहे. दुसऱ्या विद्यार्थ्यांना २१ ते २४ जुलै या कालावधीत हे प्रवेश निश्चित करावयाचे होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज