मुंबई
ज्येष्ठ पत्रकार प्रेमचंद शर्मा यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षाचे होते.
आज सकाळी शर्मा यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याआधीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रेमचंद शर्मा हे गेल्या तीन दशकापासून 'दोपहर का सामना' या वृत्तपत्रात नोकरीला होते. ते आता ज्येष्ठ सहाय्यक संपादक म्हणून काम करीत होते. त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी अमिता, दोन मुले सौरभ आणि शुभम असा परिवार आहे.