अ‍ॅपशहर

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, उद्या पित्ताशयावर होणार शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले आहे. उद्या त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

Authored byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Apr 2021, 5:42 pm
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले आहे. उद्या त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. (sharad pawar admitted to breach candy hospital and will undergo gallbladder surgery tomorrow)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, उद्या पित्ताशयावर होणार शस्त्रक्रिया


शरद पवार यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर १५ दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार आज त्याला ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.


क्लिक करा आणि वाचा- संभाजी भिडे यांच्या त्या वक्तव्यावर जयंत पाटील यांचा 'हा' इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना ३० मार्च रोजी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शस्त्रक्रिया करून त्यांच्या पित्ताशयातून खडा काढण्यात आला होता. ते काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. त्यानंतर ३ एप्रिलला त्यांना घरी सोडण्यात आले होते.

क्लिक करा आणि वाचा- मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीण परदेशींना केंद्रात मोठी जबाबदारी

त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना १५ दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र काही दिवसांनंतर पवार यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले होते.

शरद पवार यांच्या पित्तनलिकेत खडा असल्याने त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला होता. धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करून हा खडा काढून टाकण्यात आला होता.

क्लिक करा आणि वाचा- रेमडेसिवीरसाठी नागरिकांचा रस्त्यावर ठिय्या; 'त्या' यादीमुळं झाला गोंधळ
लेखकाबद्दल
सुनील तांबे
सुनील तांबे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सी न्यूज, ईटीव्ही मराठी वृत्तवाहिनी या वाहिन्यांमध्ये प्रतिनीधी आणि वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे, तसेच मुंबई सकाळ या वृत्तपत्रात मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. त्याच प्रमाणे आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून आणि मी मराठी या वृत्त वाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी युवर स्टोरी या डिजिटल मीडियात वरिष्ठ कंटेट प्रोड्युसर म्हणूनही काम पाहिले आहे. सुनील तांबे हे २०१५ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये आजतागायत कार्यरत आहेत. सुनील तांबे यांना इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडियात गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज