अ‍ॅपशहर

शरद पवार यांना आज डिस्चार्ज?; रुग्णालयातून थेट शिर्डीमध्ये होणार दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे गेल्या तीन दिवसांपासून दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. आज, गुरुवारी शरद पवार यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांकडून समजते.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 3 Nov 2022, 9:44 am
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे गेल्या तीन दिवसांपासून दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. आज, गुरुवारी शरद पवार यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांकडून समजते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad pawar
शरद पवार यांना आज डिस्चार्ज? तब्येत बिघडल्यामुळे होते ब्रीच कँडी रुग्णालयात


गेल्यावर्षी मार्च महिन्यात शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोटदुखीच्या त्रासामुळं त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात खडे तयार झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचे निदान झाले होते. नंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले होते.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत. महाराष्ट्र व देशातील राजकीय घडामोडींबाबत या शिबिरात विचारमंथन अपेक्षित असल्याचे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज