अ‍ॅपशहर

'हे' गांधी उपराष्ट्रपती म्हणून चालतील का?: शिवसेना

उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसनं उमेदवारी दिलेले गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाला शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला आहे. 'मुंबईत १९९३मध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे गांधी तुम्हाला उपराष्ट्रपती म्हणून चालतील का?; असा सवाल शिवसेनेनं देशवासीयांना केला आहे.

Maharashtra Times 17 Jul 2017, 12:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv sena opposed gopalkrishna gandhi as vice president
'हे' गांधी उपराष्ट्रपती म्हणून चालतील का?: शिवसेना

उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसनं उमेदवारी दिलेले गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाला शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला आहे. 'मुंबईत १९९३मध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे गांधी तुम्हाला उपराष्ट्रपती म्हणून चालतील का?; असा सवाल शिवसेनेनं देशवासीयांना केला आहे.

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. गोपाळकृष्ण गांधी यांनी याकूब मेमनला फाशी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसं पत्रही लिहिलं होतं. हे पत्र त्यांनी जाहीरही केलं होतं. हे निदर्शनास आणत संजय राऊत यांनी गांधी यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
Do you want Gopalkrishna Gandhi as VP ? who opposed hanging of 93 Mumbai Blast plotter Yakub Memon. Jai Hind pic.twitter.com/wHPJ4wOT9t — Sanjay Raut (@rautsanjay61) July 16, 2017 'केवळ आडनाव 'गांधी' आहे म्हणून त्यांना पाठिंबा देणं योग्य नाही. देशाविरोधात युद्ध पुकारणाऱ्या याकूबला फाशी व्हावी, ही देशाची भावना होती. गोपाळकृष्ण गांधी हे त्यावेळी देशभावनेच्या विरोधात उभे राहिले होते. अशी मानसिकता असलेल्या व्यक्तीला कोणत्याही घटनात्मक पदावर बसवणं योग्य होणार नाही,' असंही राऊत यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज