अ‍ॅपशहर

शिवसेनेच्या बैठकीत उद्या युतीचा फैसला

महापालिकेत कोणत्याही पक्षाला महापौरपदासाठीची मॅजिक फिगर गाठता आलेली नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपला युती करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यापार्श्वभूमीवर महापालिकेत युती करायची की नाही याचा फैसला करण्यासाठी उद्या शिवसेना भवनमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना

Maharashtra Times 24 Feb 2017, 3:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv sena will take decision for alliance with bjp
शिवसेनेच्या बैठकीत उद्या युतीचा फैसला


महापालिकेत कोणत्याही पक्षाला महापौरपदासाठीची मॅजिक फिगर गाठता आलेली नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपला युती करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यापार्श्वभूमीवर महापालिकेत युती करायची की नाही याचा फैसला करण्यासाठी उद्या शिवसेना भवनमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक बोलावली असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्या शनिवारी दुपारी ४ वाजता दादर शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांशी उद्धव ठाकरे संवाद साधतील. या बैठकीला शिवसेनेचे सर्व नेतेही उपस्थित राहणार आहेत. यावेळी महापालिकेत भाजपसोबत युती करायची की नाही याबाबत नगरसेवकांची काय मानसिकता आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहेत. भाजपसोबत युती करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असेल आणि युती करायची नसेल तर महापौर बनविण्यासाठी काय रणनिती आखता येईल यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांशीही उद्धव चर्चा करणार असून नंतरच युतीबाबतचा फैसला करणार असल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, उद्या बैठक झाली तरी सोमवार नंतरच उद्धव ठाकरे त्यांचे पत्ते खोलणार असल्याचे सांगण्यात येते. तर भाजपकडे शिवसेनेने स्वत:हून युतीचा प्रस्ताव देऊ नये. नाही तर भाजप त्याचे भांडवल करून पालिकेत सत्तेचा अर्ध्याहून अधिक वाटा मागेल असे शिवसेनेच्या एका गटाचे म्हणणे असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज