अ‍ॅपशहर

'या' दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साजरी करणार शिवजयंती

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद महाविकास आघाडी सरकारसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेला या मुद्यावर घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असताना शिवसेनेने सुवर्णमध्य काढला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2020, 6:10 pm
मुंबई: महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद महाविकास आघाडी सरकारसमोर अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेला या मुद्यावर घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असताना शिवसेनेने सुवर्णमध्य काढला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासन निर्णयानुसार तारेखनुसार शिवजयंती साजरी करणार असून शिवसेना मात्र तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार आहे. शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पक्षाच्या भूमिकेपासून फारकत घेत असल्याची चर्चा सुरू आहे.

शिवजयंती एकाच दिवशी साजरी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. राज्य सरकार याबाबत समिती नेमणार असून त्यानंतर शिवजयंती एकाच दिवशी साजरी करण्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनीदेखील शिवजयंतीच्या वादावर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे किमान आता तरी शिवजयंतीचा वाद संपला पाहिजे अशी मागणी त्यांनी ट्विट करून केली.


'सेनेला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा काँग्रेसी डाव'
' राम मंदिरासाठी बाळासाहेबांना भारतरत्न द्या'
महिला अत्याचारांच्या घटनांची CMकडून दखल

शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात येते. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून तारखेनुसार जयंती साजरी करण्यात येते. आघाडीचे सरकार असताना १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तज्ञांच्या एका समितीने संशोधन, अभ्यासानंतर शिवजयंती १९ फेब्रुवारी साजरी करण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. त्यानंतर आघाडी सरकारने ही १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विरोधात असलेल्या शिवसेनेने तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज