अ‍ॅपशहर

'नोटाबंदीमुळं काळा पैसा ‘गुलाबी’ झाला'

नोटांबदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर सतत दुगाण्या झाडणाऱ्या शिवसेनेनं पुन्हा एकदा बोचरी टोलेबाजी केली आहे. 'नोटांबदीमुळं काळा पैसा नष्ट झालाय असं म्हणणारे सरकारमधील शहाणे मूर्खांच्या नंदनवनात लोळत आहेत. प्रत्यक्षात तसं काहीही झालेलं नाही. देशभरातून नव्या नोटांची घबाडं जप्त होणं हे काळा पैसा नष्ट झाल्याचं लक्षण नाही. श्रीमंताकडील काळ्या पैशांचा रंग 'गुलाबी' झाला आहे, हाच काय तो फरक आहे,' अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.

Maharashtra Times 13 Dec 2016, 10:51 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena again slams modi government over demonetisation
'नोटाबंदीमुळं काळा पैसा ‘गुलाबी’ झाला'


नोटांबदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर सतत दुगाण्या झाडणाऱ्या शिवसेनेनं पुन्हा एकदा बोचरी टोलेबाजी केली आहे. 'नोटांबदीमुळं काळा पैसा नष्ट झालाय असं म्हणणारे सरकारमधील शहाणे मूर्खांच्या नंदनवनात लोळत आहेत. प्रत्यक्षात तसं काहीही झालेलं नाही. देशभरातून नव्या नोटांची घबाडं जप्त होणं हे काळा पैसा नष्ट झाल्याचं लक्षण नाही. श्रीमंताकडील काळ्या पैशांचा रंग 'गुलाबी' झाला आहे, हाच काय तो फरक आहे,' अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर आयकर विभागानं देशभरात सुरू केलेल्या छापासत्रात ठिकठिकाणांहून कोट्यवधीच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नव्या नोटा बाजारात आल्यानतंरच्या अवघ्या महिनाभरात झालेल्या या साठेबाजीमुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. हीच संधी साधून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सरकारवर तोफ डागली आहे. 'धनदांडग्यांना खुली सूट व गरीबांनी रोज रांगेत उभे राहायचे, हा निर्दयपणाचा कळसच आहे,' असा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे.

अग्रलेखातील ठळक मुद्दे:

> ‘नोटाबंदी’च्या निर्णयानंतर जे कोणी काळा पैसा खतम केल्याचे फुटके ढोल वाजवीत आहेत त्यांना जमिनी हकीकत माहीत नाही. महाराष्ट्र, हैदराबाद, चेन्नई, गुजरात, बंगळुरू येथे आतापर्यंत पडलेल्या धाडीत शेकडो कोटींच्या गुलाबी नोटांचे घबाड जप्त व्हावे हे काही चांगले लक्षण नाही. पन्नास दिवस संपण्याआधी श्रीमंतांकडील काळ्या पैशांचा रंग ‘गुलाबी’ झाला.

> ‘नोटाबंदी’च्या निर्णयानंतर काळ्या पैशांचा अंत होईल, श्रीमंतांच्या उधळपट्टीस खीळ बसेल, गोरगरीबांना ‘अच्छे दिन’ येतील, असे सांगणारे रोज आडवे पडत आहेत. गरीब जनता देशभर आजही बँकांच्या रांगेत उभीच आहे. त्यांना घर चालवायला दोन हजार रुपये बँकेतून मिळणेही कठीण झाले आहे. पण त्याच वेळी नव्या, कोर्‍या करकरीत दोन हजारांच्या शेकडो कोटींच्या नोटा ‘घबाड’ स्वरूपात पकडल्या जात आहेत.

> दिल्लीतील एका वकील महोदयांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकून सुमारे साडेतेरा कोटी रुपयांच्या ‘रोख’ नोटा जप्त केल्या. हा ‘माल’ मोठ्या प्रमाणात २००० रुपयांच्या नव्या नोटांच्या गठ्ठ्यात होता. म्हणजे मोदी ज्यास काळा पैसा वगैरे म्हणत होते तो आता हजार-पाचशेच्या नोटांतून ‘गुलाबी’ दोन हजारच्या नोटांत सरकला आहे. काळ्या पैशांचा रंग बदलला असून तो फक्त गुलाबी झाला हाच काय तो फरक आहे.

> ‘नोटाबंदी’ निर्णयाचा सगळ्यात जास्त फटका सहकारी बँकांना बसला व त्यांच्या सर्व व्यवहारांवर बंदी आणून शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. का तर म्हणे, सहकारी बँकांतून काळा पैसा पांढरा केला जाईल. सहकारी चळवळीचा हा अपमान आहे. पण त्याच वेळी हिंदुस्थानातील अनेक राष्ट्रीयीकृत बँका, अ‍ॅक्सिससारख्या विदेशी बँकांतून शेकडो कोटी रुपये काळ्यातून पांढरे केल्याची प्रकरणे उघड झाली आहेत.

> पंतप्रधान मोदी यांनी १० डिसेंबरला गुजरात येथील बनासकांटा येथे भाषण करताना सांगितले, ‘‘पन्नास दिवसांनंतर पहा, धिरे… धिरे… धिरे… परिस्थिती सुधर जायेगी.’’ पंतप्रधानांचे म्हणणे पन्नास दिवसांआधीच खरे ठरताना दिसत आहे. गरीबांची परिस्थिती वाईटाहून वाईट होत असताना ‘बड्या’ लोकांचा बालही बाका झाल्याचे दिसत नाही. त्यांच्याकडे दोन हजारांचे गुलाबी ढीग रोजच वाढत आहेत. त्यालाच परिस्थिती ‘सुधारणे’ असे समजावे काय?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज