अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांकडे अशी खूप पत्रं येत असतात, राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिरकस भाष्य केलं आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 May 2022, 11:03 am

हायलाइट्स:

  • राज ठाकरेंनी पत्र लिहून संताप व्यक्त केला
  • राऊतांनी एकाच वाक्यात निशाणा साधला
  • योगी सरकारच्या निर्णयावरही दिली प्रतिक्रिया
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay raut mns raj
शिवसेना संजय राऊत
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मनसेच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला होता. 'राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही,' असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज यांच्या या पत्रावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिरकस भाष्य केलं आहे.
'राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत मला माहिती नाही. मात्र मुख्यमंत्र्यांकडे अशी खूप पत्र येत असतात,' असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

मुंबईतील २९ ठिकाणी NIA चे छापे, महत्त्वाचे पुरावे हस्तगत; मुंबई-दिल्लीत हिंसा भडकावण्याचा कट?

यूपी सरकारच्या मुंबईत होणाऱ्या कार्यालयाविषयी काय म्हणाले राऊत?

उत्तर प्रदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी मुंबईत सरकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. याविषयी प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत म्हणाले की, 'याविषयी महाराष्ट्र सरकारकडून प्रतिक्रिया दिली जाईल. मात्र या देशात प्रत्येकाला कुठेही फिरण्याचं स्वातंत्र आहे. आपणही महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी तिथे कार्यालय उभारणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच केली आहे,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. भाजपने त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचं नेतृत्व एका भ्रष्ट नेत्याकडेच दिलं आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख