अ‍ॅपशहर

होय गद्दारच म्हणणार! मंत्रिपद उद्या जाईल, पण गद्दारीचा शिक्का नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर वार

Shivsena Uddhav Thackeray : आज आपण जो रावण जाळणार आहे, तो १० तोडांचा नाही, तर ५० खोक्यांचा आहे. बकासूर नाही, हा रावण खोकासूर आहे, धोकासूर आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधला.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2022, 8:25 pm
मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदार आणि खासदारांवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत समाचार घेतला. 'महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या सात जणांनी पहिल्यांदा शपथ घेतली त्यामध्ये मी त्यालाही मान दिला होता,' असं ते म्हणाले. तसंच शिवसेनेतून काही लोकांनी गद्दारी केली, होय गद्दारच म्हणणार. कारण आता त्यांच्या बुडाखाली जरी मंत्रिपदाच्या खुर्च्या चिकटल्या असतील तर त्या एक दिवस निघून जातील. मात्र कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray dasara speech 1
शिवसेना उद्धव ठाकरे भाषण


उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे :

- असा दसरा मेळावा फारच कमी वेळा झाला आहे, हा मेळावा बघून मी भारावून गेलो आहे.

- भाषणासाठी खूप मुद्दे आहेत, पण मी किती बोलू शकेल माहीत नाही. कारण तुमचे प्रेम पाहिल्यानंतर शब्द किती सुचतील सांगता येत नाही.

- मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणताही अनुभव नव्हता, पण अडीच वर्ष कारभार करून दाखवला.

- डॉक्टरांनी वाकण्याची परवानगी दिली नाही, पण तुमच्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जाऊ शकलो नाही

- हेच ते प्रेम आहे, ज्याने संकटात संरक्षण कवच आहे.

- इथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही, तासाची बोली लावून आणलेला नाही. तिकडे एक-एक-एकच आहे, पण इकडे एकनिष्ठ आहे.

- आज आपण जो रावण जाळणार आहे, तो १० तोडांचा नाही, तर ५० खोक्यांचा आहे. बकासूर नाही, हा रावण खोकासूर आहे, धोकासूर आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख