मुंबई: आम्ही शिवसेनेच्या कोट्यातील राज्यसभेची एक जागा संभाजीराजे छत्रपती यांना देऊ केली. संभाजीराजे आणि छत्रपती घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेने हे केले. यापेक्षा अधिक शिवसेना काय करु शकते, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा नाकारल्याच्या मुद्द्यावरून मराठा संघटना आणि संभाजीराजे समर्थकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमध्यमांशी संवाद साधला. मराठा संघटनांकडून तुमच्यावर आणि शिवसेनेवर टीका केली जात आहे, त्याबद्दल काय बोलाल, असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, माझा आणि शिवसेनेचा या सगळ्याशी काय संबंध आहे. गेल्या १५ दिवसांतील घडामोडी नीट समजून घेतल्या पाहिजेत. आम्ही शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा संभाजीराजे छत्रपतींना द्यायला तयार झालो. छत्रपती घराण्याचा यापेक्षा अधिक कोणता सन्मान शिवसेनेने करायला पाहिजे होते, हे आता सांगावे. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा ही आमची अट नव्हे तर भूमिका होती. कारण राज्यसभेतील जागा ही शिवसेनेच्या कोट्यातील आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
छत्रपतींना राजकीय पक्षाचे वावडे असण्याचे कारण नाही. सिनियर शाहू महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मालोजीराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. तर संभाजीराजे स्वत: राष्ट्रावादीकडून लढले होते आणि पराभूतही झाले होते. त्यामुळे छत्रपती घराण्यातील व्यक्ती राजकीय पक्षात जात नाहीत, हा दावा चुकीचा आहे. देशभरातील अनेक घराणी कुठल्या ना कुठल्या पक्षात राहून सामाजिक कार्य पुढे नेत आहेत. आम्ही संभाजीराजे यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी ४२ मते द्यायला तयार होतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेने अद्याप राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. आज शिवसेनेकडून यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका जाहीर करू शकतात. तत्पूर्वी संभाजीराजे आणि शिवसेनेतील चर्चेतून काही तोडगा निघणार का, हे पाहावे लागेल. अन्यथा मराठा समन्वयक आणि संभाजीराजे यांची बुधवारी रात्री किंवा उद्या सकाळी बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.