अ‍ॅपशहर

शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी का? राऊतांनी दिलं 'हे' उत्तर

राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या चार क्षेत्रांशी संबंधित व्यक्तीची वर्णी लागते. या निकषांच्या आधारे महाविकास आघाडीने १२ नावे निश्चित करून राज्यपालांना सादर केली आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Nov 2020, 4:31 pm
मुंबईः राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना अखेर राज्य सरकारच्या वतीने १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीमुळं शिवसेनेत दोन गट पडले असून काही कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उर्मिला यांना उमेदवारी देण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम urmila-madondkar


महाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून १२ सदस्यांची वर्णी लागणार आहे. सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी ४ जणांना यात संधी मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही नावे आधीच निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर बराच खल होऊन ही अखेर आज राज्यपालांकडे पाठवली गेली आहेत. या नावांच्या यादीत उर्मिला मातोंडकर यांचेही नाव आहे.

संजय राऊत यांनी उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी का दिली गेली याचे स्पष्टीकरण दिलं आहे. 'उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेच्या यादीत आहे. उर्मिला यांच्यासारखी सडेतोड बोलणारी व्यक्ती देश आणि महाराष्ट्रातील प्रश्न पुढे येऊन मांडू शकतात आणि त्यामुळं महाराष्ट्रलाच फायदा होईल,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बंद लखोट्यात आहेत 'ही' नावे!; राज्यपालांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

दरम्यान, राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात मध्यंतरीच्या काळात झालेल्या संघर्षामुळं राज्यपाल सहजासहजी यादी मंजूर करणार नाहीत असं बोललं जात आहे. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 'राज्यपाल हे कोणताही पेच निर्माण करणार नाहीत. ते सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमच प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. ते किती प्रेम आहे गे साऱ्या देशाला माहिती आहे,' असा मिश्लिक भाषेत राऊतांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

लोकलसाठी अजून किती दिवस प्रतीक्षा? रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज