अ‍ॅपशहर

पाठिंबा काढण्याची सेनेने हिंमत दाखवावी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर राज्यातील भाजप सरकार अस्थिर होईल. मात्र हे सरकार वाच‌विण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही. आम्ही तसे लेखी पत्र राज्यपालांना द्यायला तयार आहोत.

Maharashtra Times 19 Feb 2017, 5:08 am
शरद पवार यांची राजकीय गुगली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena should dare to remove their support
पाठिंबा काढण्याची सेनेने हिंमत दाखवावी


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर राज्यातील भाजप सरकार अस्थिर होईल. मात्र हे सरकार वाच‌विण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही. आम्ही तसे लेखी पत्र राज्यपालांना द्यायला तयार आहोत. शिवसेनेनेही सरकारचा पाठ‌िंबा काढून घेत असल्याचे पत्र राज्यपालांकडे द्यावे, अशी राजकीय गुगली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी टाकली.
पालिकेच्या निवडणुकीत सेना-भाजप या सत्ताधारी पक्षांत कलगीतुरा सुरू आहे. त्यावरून राज्यातील सरकार पालिकेच्या निवडणुकीनंतर अस्थिर होईल, असे भाकीत पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. शिवसेनेनेही सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला होता.

मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचा पाठिंबा काढण्याचा पक्षाचा विचार नसल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाच पवार यांनी पुन्हा गुगली टाकली आहे.
आम्ही भाजपसोबत जाणार नाही. तसे लेखी पत्र लिहून देण्यास तयार आहोत. ते पत्र राज्यपालांकडे पाठविण्याचीही आमची तयारी आहे. शिवसेनेनेसुद्धा केवळ पाठिंबा काढण्याच्या बाता न करता तसे पत्र थेट राज्यपालांना देण्याची हिंमत दाखवावी, असे पवार म्हणाले.

‌शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’वर बंदी आणण्याची भाजपच्या काही नेत्यांची मागणी म्हणजे हुकूमशाहीचे प्रतिक आहे. वृत्तपत्रांना स्वातंत्र्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या कारभाराकडे लक्ष द्यायला हवे, मात्र ते पालिका निवडणुकीत अधिक सक्रिय झालेले दिसत आहेत, असा टोलाही पवार यांनी लगावला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज