अ‍ॅपशहर

BMW भेटीवरही शोभा डेंचा खोचकपणा

भारताच्या ऑलिंपिककन्यांना दिलेल्या बीएमडब्ल्यू कार त्यांच्यासाठी पांढरा हत्ती ठरू नयेत, अशी 'ट्विपण्णी' करून शोभा डे यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. खेळाडूंच्या आर्थिक परिस्थितीवर, उत्पन्न क्षमतेवरच शोभा डे यांनी शंका घेतल्यानं नेटकरी खवळले आहेत.

Maharashtra Times 29 Aug 2016, 6:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shobha de controversial comment on bmw gift to sindhu sakshi
BMW भेटीवरही शोभा डेंचा खोचकपणा


'रिओ जाओ, सेल्फी लो, खाली हात वापस आओ' या ट्विटवरून भल्याभल्यांनी वाभाडे काढल्यानंतरही वादग्रस्त लेखिका शोभा डे शहाण्या झालेल्या दिसत नाहीत. कारण, भारताच्या ऑलिंपिककन्यांना दिलेल्या बीएमडब्ल्यू कार त्यांच्यासाठी पांढरा हत्ती ठरू नयेत, अशी 'ट्विपण्णी' करून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. खेळाडूंच्या आर्थिक परिस्थितीवर, उत्पन्न क्षमतेवरच शोभा डे यांनी शंका घेतल्यानं नेटकरी खवळले आहेत.

ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटन क्वीन पी व्ही सिंधू, कांस्य पदकावर नाव कोरणारी कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्टिक्समध्ये जगाचं मन जिंकणारी दीपा कर्मकार यांचा बीएमडब्ल्यू कंपनीनं लक्झरी कार देऊन गौरव केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते कालच या तिघींना कारची चावी देण्यात आली. चकाचक, आलिशान बीएमडब्ल्यूसोबत या तिघींचे फोटो पाहून सगळ्यांनाच आनंद झाला, अभिमान वाटला. मात्र, शोभा डे यांनी या सत्काराकडे बीएमडब्ल्यूची जाहिरात म्हणून पाहिलं.

Great ad for BMW. Who will pay for running these pricy beasts? Hoping they don't become white elephants for athletes pic.twitter.com/MX0od5sTt3 — Shobhaa De (@DeShobhaa) August 29, 2016 तेही ठीक होतं, पण या गाड्या चालवण्यासाठी पैसे कोण देणार?, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी वादाची काडी टाकली आहे. या कार क्रीडापटूंसाठी पांढरा हत्ती ठरू नयेत, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली. त्यामुळे ट्विपल्स पुन्हा शोभा डे यांच्यावर तुटून पडलेत.

याआधी, रिओ ऑलिंम्पिकदरम्यान अखिलाडूवृत्ती दाखवून शोभा डे यांनी स्वत:चीच शोभा करून घेतली होती. ‘टीम इंडियाचे रिओ ऑलिम्पिकमधील लक्ष्य : रिओला जा. सेल्फी काढा. रिकाम्या हाताने परत या. पैसे आणि संधी वाया...’ अशा अर्थाचं ट्विट त्यांनी केलं होतं. यावर केवळ खेळाडूच नव्हे, तर कलाकार, राजकीय नेते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य ‘करदात्यां’नीही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज