अ‍ॅपशहर

‘भारतातील जीवन कटकटीचे’

ChintamanipMTमहाराजा सयाजीराव गायकवाड साहित्य नगरी, बडोदा'नीट जगण्याची व्यवस्था म्हणजे सभ्यता असून भारतात नीट जगण्यात अडथळे येतात...

Maharashtra Times 18 Feb 2018, 2:31 am
Chintamani.Patki@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shyam manohar on indian society
‘भारतातील जीवन कटकटीचे’


Tweet: ChintamanipMT

महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्य नगरी, बडोदा

'नीट जगण्याची व्यवस्था म्हणजे सभ्यता असून भारतात नीट जगण्यात अडथळे येतात. हे अडथळे जीवनातून साहित्यात येतात. देशाचे वास्तव हे आहे की येथील जीवन कटकटीचे आहे. ठोस भाषा, शब्दप्रयोग, संज्ञा, रस्त्यावर होणारा भाषाव्यवहार चोख नसणे हे त्याचे कारण आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी शनिवारी देशातील व्यवस्थेवर टीकास्र सोडले.

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वि. पां. दांडेकर व्यासपीठावर श्याम मनोहर यांचा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ गुजराती साहित्यिक सितांशू, संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते. 'संस्कृती आणि सभ्यता हे शब्द भारतात पहिल्यांदा कोणी वापरले? सिव्हिलायझेशन आणि कल्चर या इंग्रजी संज्ञाचा मराठी अर्थ काढावा का वाटला? मग येथे आधी जगण्यात काय होते?' असे सवाल श्याम मनोहर यांनी देशातील सभ्यता आणि असभ्यता यावरून केले.

'देशाला साहित्यिक, कलावंत, संशोधक हवे आहेत का? हो उत्तर असेल तर हे सर्व घटक स्वतंत्रपणे जगतील अशी परिस्थिती ७० वर्षांत निर्माण झाली आहे का,' असा सवाल श्याम मनोहर यांनी केला. 'स्वातंत्र्य हा लोकशाहीचा गाभा आहे,' हे त्यांनी त्यांनी अधोरेखित केले. 'कार्यक्रमात गंगाधर पानतावणे यांचाही सत्कार करण्यात येणार होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी करण्यात येईल,' असे श्रीपाद जोशी यांनी सांगितले.

डाव्या-उजव्याची चर्चा होऊ द्या

ज्ञान म्हणजे काय याची देशात चर्चा आहे काय? डावे-उजवे याची चर्चा होऊ द्या. देशात उच्च दर्जाचे संशोधन, साहित्य निर्माण होत आहे का? ज्ञान निर्माण करणे सोपे असते या समजामुळे समाजात गोंधळ वाढत आहे. तपश्चर्या करावी पण जिंकण्याची स्पर्धा कशासाठी हवी? आस्तिक आणि नास्तिक यांनी जीवनाचा अर्थ समाजाला सांगावा. जगण्यातील नाना अवस्थांचे प्रश्न निर्माण करून समाजमन सुधरावे. भारत देश वाचनालयांचा व्हावा. अर्थसंकल्पात किरकोळ कविता वाचल्या जातात. मराठीत पुरेसे साहित्य नाही का?

- श्याम मनोहर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज