अ‍ॅपशहर

'सिंहगड'च्या इंजिनात बिघाड, ‘मरे’चा बोजवारा

ठाणे स्टेशनजवळच्या पारसिक बोगद्याजवळ आज सकाळी सिंहगड एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस बंद पडल्याने अप जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि नोकरदारांचे हाल झाले.

Maharashtra Times 26 Jul 2016, 11:24 am
मटा ऑनलाइन वृत्त । ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sinhagad express engine failed
'सिंहगड'च्या इंजिनात बिघाड, ‘मरे’चा बोजवारा


ठाणे स्टेशनजवळच्या पारसिक बोगद्याजवळ आज सकाळी सिंहगड एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस बंद पडल्याने अप जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि नोकरदारांचे हाल झाले. ही वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्याचा उपाय रेल्वे प्रशासनाने केला, पण त्यामुळे या मार्गावर एकापाठोपाठ एक पाच-सहा लोकलची रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यात बिच्चारा चाकरमानी पुरता लटकला, रखडला. त्यातच, दिवा स्थानकातील प्रवासी रुळावर उरल्याने लोकल गोंधळात अधिक भर पडली आहे.

पुण्याहून मुंबईकडे येणारी ११०१० अप सिंहगड एक्सप्रेस बुधवारी पहाटे ६:०५ मिनिटांनी पुण्याहून सुटली. सकाळी ९:१५ च्या सुमारास एक्सप्रेस पारसिक बोगद्याजवळ पोहोचली असताना अचानक इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे मागच्या सगळ्या लोकल जागच्या जागी उभ्या राहिल्या. इंजिन दुरुस्त करण्याचं काम रेल्वे अभियंत्यांनी तातडीने सुरू केलं, पण ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने काही मिनिटांतच वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.

बराच वेळ लोकल एकाच जागी थांबल्यानं वैतागलेल्या प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून जवळचं स्टेशन गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रुळांवर एका बाजूला लोकलची आणि दुसऱ्या बाजूला प्रवाशांची रांग लागली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज