अ‍ॅपशहर

विद्यार्थिनींच्या करिअरशी खेळ

एसएनडीटी विद्यापीठाच्या चर्चगेट येथील कॉलेजमध्ये बेजबाबदार कारभाराचा नवा नमुना समोर आला आहे. इथे काही विद्यार्थिनींची मूळ प्रमाणपत्रेच गहाळ करण्यात आली आहेत.

Maharashtra Times 27 Jun 2017, 4:08 am
lahoo.sarfare@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sndt missing original certificate of students
विद्यार्थिनींच्या करिअरशी खेळ


Tweet : @Lahoo_MT

मुंबई : मुलींसाठी शिक्षणाची नवी कवाडे उघडल्याचा दावा करणाऱ्या एसएनडीटी विद्यापीठाच्या चर्चगेट येथील कॉलेजमध्ये बेजबाबदार कारभाराचा नवा नमुना समोर आला आहे. इथे काही विद्यार्थिनींची मूळ प्रमाणपत्रेच गहाळ करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे याबाबत आम्ही काहीच करू शकत नाही, असा अजब पवित्रा घेऊन कॉलेज प्रशासनाने चक्क हात वर केले आहेत.

२०१५-१६ या शैक्षणिक वर्षात ११वीला प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थिनींनी १२वी उत्तीर्ण झाल्यावर अन्य कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी एसएनडीटी कॉलेजकडे दाखला व दहावीच्या मूळ गुणपत्रिकेची मागणी केली. सुरुवातीला तुमचे अर्ज मिळत नाहीत, असे सांगून उद्या या, परवा या अशी टाळाटाळ करण्यात आली. मात्र काही विद्यार्थिनींनी पाठपुरावा केल्यानंतर आमच्याकडे अर्ज व प्रमाणपत्रे सापडत नाहीत, तुम्ही आपापल्या शाळांमध्ये डुप्लिकेटसाठी अर्ज करा, असे बिनदिक्कत सांगण्यात आले. त्यावर डुप्लिकेट गुणपत्रिका तातडीने मिळणार नसल्याने प्रवेश रद्द झाल्यास किंवा वर्ष वाया गेल्यास एसएनडीटी कॉलेज भरपाई देणार का, असा सवाल विद्यार्थिनींनी केला आहे. आठ दिवसांत कॉलेजने मूळ प्रमाणपत्रे शोधून दिली नाहीत किंवा ती गहाळ केल्याची जबाबदारी घेणारे पत्र दिले नाही, तर कायदेशीर मार्गाने दाद मागू, असा इशारा या विद्यार्थिनींनी दिला आहे.

संबंधित मुलींना अन्य कॉलेजांमध्ये यादीत नाव लागल्यास दहावी, बारावीच्या गुणपत्रिका आणि दाखल्याच्या मूळ प्रती सादर कराव्या लागणार आहेत. डुप्लिकेट गुणपत्रिका मिळण्यासाठी काही दिवस जाणार असल्याने प्रवेश रद्द झाल्यास किंवा वर्ष वाया गेल्यास एसएनडीटी कॉलेज भरपाई देणार का, असा सवाल या विद्यार्थिनींकडून विचारला जात आहे. शिवाय कॉलेज प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाचा आम्हाला नाहक त्रास का? आम्ही विश्वासाने मूळ प्रमाणपत्रे सादर करतो. त्याबद्दल असा बेफिकीरपणा दाखवून आमच्या करिअरशी खेळ केला जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

विद्यापीठाच्या उलट्या बोंबा

सुरुवातीला विद्यार्थिनींनी पाठपुरावा केल्यानंतर तुम्ही मूळ प्रमाणपत्रे सादर केली होती का, असा आश्चर्यजनक प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या विद्यार्थिनींनी प्रमाणपत्रे सादरच केली नव्हती, तर कॉलेजने त्यांना फी भरल्याच्या पावत्या कशा दिल्या व दोन वर्षे कॉलेजमध्ये प्रवेश कसा दिला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज