अ‍ॅपशहर

...अन् सोनू निगमने टक्कल 'करून दाखवलं'!

मी फक्त अजानबद्दल बोललो नव्हतो तर मंदिर आणि गुरूद्वाराबद्दलही बोललो होतो असं म्हणत गायक सोनू निगम याने आपण मुस्लिमविरोधी नसल्याचे स्पष्ट केले. एका मौलवीने काढलेल्या फतव्याला प्रत्युत्तर म्हणून सोनू निगमने पत्रकार परिषदेनंतर टक्कल केले.

Maharashtra Times 19 Apr 2017, 3:11 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sonu nigam controversy on loudspeakers
...अन् सोनू निगमने टक्कल 'करून दाखवलं'!


मी फक्त अजानबद्दल बोललो नव्हतो तर मंदिर आणि गुरूद्वाराबद्दलही बोललो होतो असं म्हणत गायक सोनू निगम याने आपण मुस्लिमविरोधी नसल्याचे स्पष्ट केले. एका मौलवीने काढलेल्या फतव्याला प्रत्युत्तर म्हणून सोनू निगमने पत्रकार परिषदेनंतर टक्कल केले. टक्कल करणाऱ्या इसमाला तो फतवा काढणाऱ्या मौलवीने आता दहा लाख रुपये द्यावे असे आवाहन सोनूने केले.

काही दिवसापूर्वी सोनू निगमने केलेल्या ट्विटमुळे प्रार्थनास्थळावरील लाऊडस्पीकरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. सोनू निगमच्या ट्विटनंतर त्याला या मुद्यावरून सोशल मिडियावर पाठिंबा आणि विरोधही सहन करावा लागला. सोनू निगमने आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मी पूर्णपणे धर्मनिरपेक्ष असून धर्माच्या नावावर गोंधळ घालणे ही गुंडगिरी असल्याचे म्हणत धार्मिक स्थळावर लाऊडस्पीकर असता कामा नये अशी भूमिका असल्याचे सोनू निगमने म्हटले. सोनू निगमने सोशल मिडियावर चर्चा झोडणाऱ्यांवर टीका केली. लोक ट्विटरवर बोलतात पण त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी प्रत्यक्षात अशा मुद्यांवर बोलावे असे आव्हान सोनूने दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज