मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मशिदींच्या भोंग्यावरून दिल्या जाणाऱ्या 'अजान'ला आक्षेप घेतल्यामुळं टीकेचा धनी ठरलेला पार्श्वगायक सोनू निगम यानं आता 'अजान' रेकॉर्ड केलेला व्हिडिओच ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करतानाच त्यानं 'गुड मॉर्निंग इंडिया' असं खोचक ट्विट केलं आहे. त्याच्या या ट्विटमुळं नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
सोनू निगमनं काही दिवसांपूर्वीच मशिदीच्या भोंग्यांवरून होणाऱ्या अजानला आक्षेप घेतला होता. 'मी मुस्लिम नसतानाही मला अजानच्या आवाजानं जागं व्हावं लागतं. भारतातील ही धार्मिक बळजबरी कधी थांबणार?,' असं ट्विट त्यानं केलं होतं. या ट्विटमुळं तो वादात सापडला होता. सोशल मीडियावरून त्याच्यावर टीका झाली होती. त्यावर, मी धर्माच्या विरोधात नव्हे तर लाउडस्पीकरच्या विरोधात बोललो होतो आणि त्या मतावर मी ठाम आहे, असं प्रत्युत्तर सोनूनं दिलं होतं. सोनूला अनेकांनी पाठिंबाही दर्शवला होता. हा वाद आता शांत झाल्याचं वाटत असतानाच आज सोनूनं 'अजान'चा रेकॉर्डेड व्हिडिओ ट्विट केला आहे. Goodmorning India pic.twitter.com/gG8lqPZTSQ — Sonu Nigam (@sonunigam) April 23, 2017