अ‍ॅपशहर

बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांची मुंबईत बदली

बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे पोलीस अधिक्षक शिवदीप लांडे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे.

Maharashtra Times 13 Jan 2017, 10:18 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sp shivdeep lande transfer in maharashtra
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांची मुंबईत बदली


बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे पोलीस अधिक्षक शिवदीप लांडे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे.

शिवदीप लांडे यांनी वैयक्तिक कारणासाठी महाराष्ट्रात बदली करण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांची मागणी मान्य करत ही बदली करण्यात आली असून तीन वर्षासाठी त्यांना महाराष्ट्रात पाठवण्यात आले आहे. बिहारच्या स्पेशल टास्क फोर्सचे पोलीस अधीक्षक म्हणून ते कार्यरत होते. या पदावर असताना त्यांनी बिहारच्या खाण माफीयांचं कंबरडं मोडलं होतं. खाण माफियांबरोबरच गुंड आणि रोड रोमियोंनाही त्यांनी अस्मान दाखवले होते. त्यामुळे तरुणींमध्येही त्यांची लोकप्रियता वाढली होती. लांडे आता महाराष्ट्रात येणार असल्याने आपल्या धडाकेबाज कामगिरीनं येथील गुंडांनाही ते घाम फोडतील अशी चर्चा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज