अ‍ॅपशहर

एसटी तिकिटात एक रुपयाने वाढ

एसटी अपघातग्रस्तांच्या सहाय्यतेसाठी निधी उभारण्यासाठी महामंडळाने प्रवाशांच्या तिकिटांवर एक रुपया शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून (१ एप्रिल) लागू करण्यात आली आहे.

Maharashtra Times 2 Apr 2016, 3:39 am
मासिक पास नूतनीकरणास ५ रुपये शुल्क
महाराष्ट्र टाइम्स.कॉम st fare increased by one rupee
एसटी तिकिटात एक रुपयाने वाढ


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

एसटी अपघातग्रस्तांच्या सहाय्यतेसाठी निधी उभारण्यासाठी महामंडळाने प्रवाशांच्या तिकिटांवर एक रुपया शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून (१ एप्रिल) लागू करण्यात आली आहे.

तिकिटांवर शुल्क आकारण्यात आल्यानंतर त्यातून येणाऱ्या निधीतून अपघातग्रस्तांना भरघोस आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली. सध्या मृत व्यक्तीच्या वारसांना तीन लाख रुपये देण्यात येतात. त्याऐवजी दहा लाख रुपये वारसांना मिळतील. तर जखमींना उपचारासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी उभारण्यासाठी तिकिटांवर एक रुपया शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय मासिक पास धारकांना पास घेताना व त्याचे नूतनीकरण करताना पाच रुपये तर त्रैमासिक पासधारक प्रवाशांना १५ रुपये द्यावे लागतील. प्रासंगिक कराराच्या बससाठी ५० रुपये आणि आवडेल तेथे प्रवास पासधारकाला पाच रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या योजनेला एसटी महामंडळाने ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना’नाव दिले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज