अ‍ॅपशहर

ST strike in maharashtra: एसटी संपात सहभागी झालेले १० हजार कर्मचारी निलंबित

गेल्या ४३ दिवसांपासून राज्यात एसटी संप सुरू आहे. या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण १० हजार ३० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 9 Dec 2021, 9:50 am
मुंबई : एसटी संपात सहभागी झालेल्या १० हजार ३० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने बुधवारी रात्री जाहीर केली. याचबरोबर दोन हजार १४ रोजंदार कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ST strike in maharashtra


एसटी कर्मचारी सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने तब्बल एक हजार ९९६ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. राज्यातील ११५ आगार पूर्णपणे, तर १३५ आगार अंशतः बंद आहेत.

एसटी संपात सहभागी झालेल्या 'त्या' ७३ हजार कर्मचाऱ्यांना मोठा फटका
चिंताजनक! 'ओमिक्रॉन' चाचणीसाठी लागणाऱ्या किटचा राज्यात अभाव

दरम्यान, मागील ४३ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह लाखो सवलतधारकांच्या खिशावर महागड्या प्रवासाचा भार पडत आहे. संपामुळे सवलतीसाठी आवश्यक स्मार्ट कार्ड नोंदणी-वितरण प्रक्रिया बंद आहे. नव्या वर्षात, अर्थात एक जानेवारीपासून हे कार्ड नसलेल्यांना सवलत मिळणार नाही. यामुळे 'संप मिटेना, स्मार्ट कार्ड मिळेना,' अशी सवलतधारकांची स्थिती झाली आहे. दरम्यान, तब्बल ३० दिवसांनंतर बुधवारी राज्य परिवहन महामंडळाच्या येवला आगारातून दोन बसेस येवला ते नाशिक मार्गावर धावल्या. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी तीन चालक आणि दोन वाहक बुधवारी कामावर हजर झाले.

महत्वाचे लेख