अ‍ॅपशहर

भाजपवर टीका, मालिकेतून काढलं; किरण माने आता शरद पवारांना भेटणार?

या सगळ्या वादानंतर 'मुलगी झाली हो' मालिकेच्या निर्मात्यांकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. किरण माने यांना राजकीय भूमिका घेतल्यामुळे मालिकेतून काढण्यात आलेले नाही. त्यांच्यावर व्यावसायिक कारणांमुळे कारवाई करण्यात आल्याचे मालिकेच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2022, 9:59 am

हायलाइट्स:

  • एखाद्याला मालिकेतून काढल्यावरुन राजकारण करणे योग्य नाही
  • 'स्टार प्रवाह'चे मालक, मालिकेचे दिग्दर्शक किंवा निर्मात्यांचा भाजपचा कोणताही संबंध नाही
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kiran Mane Sharad Pawar
या सगळ्या वादानंतर 'मुलगी झाली हो' मालिकेच्या निर्मात्यांकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मुंबई: सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेत पोस्ट टाकल्यामुळे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. यावरुन सध्या सोशल मीडिया आणि राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता अभिनेते किरण माने (Kiran Mane) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र, किरण माने शनिवारी सकाळी साडेदहा वाजता मुंबईतील सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांना भेटणार असल्याचे समजते. त्यामुळे हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या सगळ्या वादानंतर 'मुलगी झाली हो' मालिकेच्या निर्मात्यांकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. किरण माने यांना राजकीय भूमिका घेतल्यामुळे मालिकेतून काढण्यात आलेले नाही. त्यांच्यावर व्यावसायिक कारणांमुळे कारवाई करण्यात आल्याचे मालिकेच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले.

किरण मानेंना मालिकेतून काढण्यात भाजपचा हात नाही: प्रवीण दरेकर

एखाद्याला मालिकेतून काढल्यावरुन राजकारण करणे योग्य नाही. 'स्टार प्रवाह'चे मालक, मालिकेचे दिग्दर्शक किंवा निर्मात्यांचा भाजपचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे हा 'स्टार प्रवाह' स्वतंत्र विषय आहे. किरण माने यांना मालिकेत पुन्हा घेतलं तरी आमची हरकत नाही. काढणं, ठेवणं हा सर्वस्वी 'स्टार प्रवाह'चा अधिकार आहे, असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
Kiran Mane: राजकीय टिप्पणी केल्याने अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढलं, जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले...

'एखादी विचारसरणी लादण्यासाठी कलाकारांच्या पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही'

अभिनेते किरण माने यांनी त्यांचे विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे. सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का? असा संतप्त सवाल विचारत, महाराष्ट्र हे कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

भाजप सरकारविरोधात समाज माध्यमावर मत व्यक्त केले म्हणून ‘स्टार प्रवाह’ या खाजगी वाहिनीने किरण माने या कलाकाराला ‘मुलगी झाली हो’, या मालिकेतून काढण्यात आले हे अत्यंत निषेधार्ह असून ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीने केलेल्या या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे, असे लोंढे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज