अ‍ॅपशहर

पाणी गोडे करण्यापेक्षा गळती थांबवा; भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

समुद्राचे पाणी गोडे करणे परवडणारे नाही, त्याऐवजी गळती थांबवली तर कमी खर्चात मुंबईकरांना मुबलक पाणी मिळेल, असं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स 25 Nov 2020, 8:02 am
मुंबई: समुद्राचे रोज २०० दशलक्ष लिटर पाणी गोडे करण्यासाठी १६०० कोटींच्या प्रकल्पाची गरज आहे का, महागड्या प्रकल्पाऐवजी त्यातील ४० टक्के खर्चात सध्याची गळती थांबली तर रोज २०० दशलक्ष लिटरच्या दुप्पट पाणी वाचेल, अशी भूमिका भाजपचे नेते आशीष शेलार यांनी मांडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Uddhav Thackeray


समुद्राचे रोज २०० दशदशलक्ष लिटर पाणी गोडे करण्याच्या राज्य सरकारच्या प्रकल्पाबाबत शेलार म्हणाले, 'मुंबईचा रोजचा पाणीपुरवठा ३८०० दशलक्ष लिटर आहे. गळतीमुळे रोज वाया जाणारे पाणी सुमारे ९०० दशलक्ष लिटर आहे. महापालिका आणि आतंरराष्ट्रीय मानकाप्रमाणे कमीतकमी १० टक्के म्हणजे ३८० दशलक्ष लिटर पाण्याची गळती सहज थांबवता येते. 'एच पश्चिम प्रभागात, पायलट प्रोजेक्ट करून एका वर्षात गळतीने वाया जाणारे १०० कोटी लिटर पाणी वाचवले. पालिका २४ प्रभागांत असा प्रयत्न करून वाया जाणारे पाणी का वाचवत नाही', असा सवाल त्यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज