अ‍ॅपशहर

ड्रग्ज प्रकरणातील संशयित कलाकारांचे शुटिंग थांबवा, अन्यथा...; आठवलेंनी दिला 'हा' इशारा

अभिनेत्री दीपिका पदुकोण व सारा अली खानसह चार अभिनेत्रींना नार्कोटिक्स कण्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. आता या प्रकरणावरून रामदास आठवले यांनीही या कलाकारांनी इशारा दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Sep 2020, 5:41 pm
मुंबईः सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज रॅकेट समोर आल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो सक्रिय झाला आहे. या प्रकरण सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर दीपिका, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही नावं समोर आली आहेत. यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या कलाकारांना व निर्मात्यांना इशारा दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramdas aathavle


सुशांतनं आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याचा तपास सीबीआय करत असतानाच या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात आता एनसीबी पथकानंही काही कलाकारांवर कारवाई केली आहे. तसंच, बॉलिवूडमधील अन्य कलाकारांवरही एनसीबी पथकाची करडी नजर आहे. गेल्या दोन दिवसांपासून अभिनेत्री रकुल प्रीत, दीपिका पदुकोण, सारा अली खान अशा बड्या कलाकारांची नाव समोर आली आहेत. यावरूनच रामदास आठवले यांनी ड्रग्ज प्रकरणात नावं समोर आलेल्या कलाकारांना ब्लॅक लिस्ट करत चित्रपट निर्मात्यांना त्यांना यापुढं चित्रपटात काम न देण्याचं आवाहन केलं आहे. जर, निर्मात्यांनी तसं न केल्यास आरपीआयचे कार्यकर्ते चित्रकरण बंद पाडतील, असा सूचनावजा इशारा त्यांनी दिला आहे.

'पवारांसोबत राहून राऊतांना कोलांट्या मारण्याची सवय झाली'

'एनसीबीच्या पथकाकडून करण्यात आलेल्या तपासणीत बॉलिवूडचा खरा चेहरा समोर आला आहे. मात्र, अभिनेत्रींबरोबरच अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांची नावंदेखील समोर आली पाहिजेत. त्याचबरोबर, सुशांतच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या लोकांचीही नाव लवकरात लवकर समोर आली पाहिजेत,' असं ते म्हणाले आहेत.

सुशांतसिंह प्रकरण: रियाचे वकील मानेशिंदे यांचा गंभीर आरोप

दिशा सालियानच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा

सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूची देखील सीबीआय चौकशी करण्यात यावी. दिशाच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी कोणत्याही चौकशी व पुराव्यांशिवाय दिशानं आत्महत्या केल्याचं सांगितलं जे पूर्णपणे चुकीचं आहे. दिशाच्या मृत्यूच्या एकदिवस आधी तिला टॉर्चर केलं गेलं, असा धक्कादायक खुलासा आठवले यांनी केला आहे. तसंच, दिशाचा मृत्यू ८ जूनला झाला तर, सुशांतचा मृत्यू १४ जूनला त्यामुळं या दोघांच्या मृत्यूशी एकमेकांशी संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


'एनसीबीच्या कार्यालयात जे घडतंय, ते बाहेर कसं येतंय?'

अनुराग कश्यपला अटक करा

बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर केलेल्या आरोपांनतर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली आहे. अनुरागला लवकरात लवकर अटक झाली नाही तर पक्षाचे कार्यकर्ते ओशिवरा पोलिस ठाण्यात आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज