अ‍ॅपशहर

बालिका ज्ञानदेव यांना सुभाष भेंडे पुरस्कार

सुप्रसिद्ध लेखक सुभाष भेंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या सुभाष भेंडे नवोदित लेखक पुरस्कारासाठी यंदा बालिका ज्ञानदेव यांची निवड करण्यात आली आहे. ‘मॅगझिनीतून सुटतेय गोळी’ या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Maharashtra Times 18 May 2017, 4:00 am
मुंबई : सुप्रसिद्ध लेखक सुभाष भेंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या सुभाष भेंडे नवोदित लेखक पुरस्कारासाठी यंदा बालिका ज्ञानदेव यांची निवड करण्यात आली आहे. ‘मॅगझिनीतून सुटतेय गोळी’ या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस आणि भेंडे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची घोषणा समितीचे निमंत्रक अशोक कोठावळे यानी केली. स्मृतिचिन्ह आणि ११ हजार १११ रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकवाङ्मय गृहातर्फे हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम subhash bhande award tor balika gyanadeo
बालिका ज्ञानदेव यांना सुभाष भेंडे पुरस्कार


डॉ. विलास खोले, डॉ. रेखा इनामदार-साने, संजय भास्कर जोशी या परीक्षकांनी ही निवड केली आहे. पोलिस म्हणून करिअर स्वीकारल्यानंतर जे विदारक अनुभव वाट्याला येतात ते या काव्यसंग्रहात तीव्र आणि उत्कट शब्दांमध्ये कवयित्रीने मांडले आहेत, असे मत पुरस्कार समितीने व्यक्त केले आहे. या कवितांमधून व्यक्त होणारे दुःख आणि वेदना कोणा एका विशिष्ट व्यक्तीच्या राहत नाहीत. त्या समस्त स्त्रीच्या जगण्याच्या होतात. प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत राहतात, असेही निरीक्षण या समितीने नोंदवले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज