मुंबई : कुलाब्याजवळ नौदल गोदीमधील 'आयएनएस तबर' या युद्धनौकेवरील खलाशी सी. आर. नायकलु याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. मूळचा आंध्र प्रदेशमधील या खलाशाला त्याच्या सहकाऱ्यांनी अश्विनी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. नायकलु याने पहाटेच्या वेळेस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आला.
युद्धनौकेवर आत्महत्या
कुलाब्याजवळ नौदल गोदीमधील 'आयएनएस तबर' या युद्धनौकेवरील खलाशी सी आर नायकलु याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली...
Maharashtra Times 11 Feb 2018, 2:40 am