अ‍ॅपशहर

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

Maharashtra Times 28 Feb 2017, 10:58 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sumit malik will be new chief secretary of maharashtra
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक


राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आज सेवानिवृत्त होत आहेत. ते ३१ जानेवारीलाच सेवानिवृत्त झाले होते. मात्र, राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना एक महिन्याची मुदतवाढ मिळाली होती. ही वाढीव मुदत आज संपत आहे. त्यांच्या जागी मलिक यांची वर्णी लागली आहे. मलिक हे १९८२ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते सामान्य प्रशासन विभागाचे (राज शिष्टचार) अतिरिक्त मुख्य सचिव असून मुख्य राजशिष्टाचार अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ज्येष्ठतेच्या निकषावर त्यांना संधी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यांना सुमारे दोन वर्षांचा कार्यकाळ मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज