अ‍ॅपशहर

सुप्रिया सुळेंनीही घेतली भुजबळांची भेट

बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ-सुळे भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Maharashtra Times 24 Sep 2016, 9:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम supriya sule meets chhagan bhujmal in j j hospital
सुप्रिया सुळेंनीही घेतली भुजबळांची भेट


बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ-सुळे भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुंडे-भुजबळ भेटीची दखल घेत शिवसेनेने भुजबळांपासून अलिप्त राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली होती. पंकजा मुंडे यांनी भुजबळांना भेटून दाखवलेले धाडस कौतुकास्पद असून, असे धाडस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही दाखवण्याची गरज होती, अशा शब्दात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचले होते.

भुजबळांनी केलेली अघोरी कृत्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीच केलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र भुजबळांपासून दूर राहत आहे, असे म्हणत आज भुजबळ जात्यात असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेत नेते सुपात आहेत अशी खडे बोल शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावले होते.

मुंडे- भुजबळ भेटीमुळे नाशिकमधील ओबीसी राजकारणाला वेग आल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भुजबळ आणि सुप्रिया सुळे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भुजबळ विविध घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज