अ‍ॅपशहर

तन्मयविरोधात पोलिस तक्रार

‘एआयबी’च्या तन्मय भट्टने भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांची टिंगलटवाळी करणारा व्हिडीओ इंटरनेटवर टाकल्याने समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, बहुतेक सर्व राजकीय पक्षांनीही संताप व्यक्त केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात, तर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी वांद्रेच्या सायबर पोलिसांत तन्मयविरोधात तक्रार दिली आहे.

Maharashtra Times 31 May 2016, 4:00 am
वादग्रस्त व्हिडीओ डीलिट’ करण्याचेही प्रयत्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tanmay
तन्मयविरोधात पोलिस तक्रार

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

‘एआयबी’च्या तन्मय भट्टने भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांची टिंगलटवाळी करणारा व्हिडीओ इंटरनेटवर टाकल्याने समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, बहुतेक सर्व राजकीय पक्षांनीही संताप व्यक्त केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात, तर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी वांद्रेच्या सायबर पोलिसांत तन्मयविरोधात तक्रार दिली आहे.

लतादीदी आणि सचिन यांच्याविरोधात अश्लील आणि खालच्या पातळीचे विनोद केल्याने, तन्मयला सर्वांकडून खडे बोल सुनावले जात आहेत. ‘एआयबी’विरोधात लेखी तक्रार दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मात्र, ज्या मान्यवरांवर ही टिपण्णी कली आहे. त्यापैकी कोणीही तक्रार दिली नसल्याने कायद्यानुसार अशा प्रकारावर काय कारवाई होऊ शकते, याबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे पोलिस उपायुक्त संग्राम निशाणदार यांनी सांगितले.

तन्मयच्या ‘एआयबी’ कार्यक्रमात सचिन आणि लतादीदींचे चेहरे मॉर्फ करून एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. ज्यात लतादीदी आणि सचिन यांच्यातील खोटे संभाषण दाखवले गेले. मात्र, यातील संवाद हे आक्षेपार्ह आणि अवमान करणारे होते. याबाबत तक्रार आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस उपायुक्त एस. राजकुमार यांनी, हे आक्षेपार्ह व्हिडीओ गुगल, यूट्यूब आणि फेसबुकवरून काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. याबाबत भाजपचे आशीष शेलार आणि शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनीही पोलिस आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.

वादग्रस्त ‘एआयबी’

मुंबईत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या ‘एआयबी’ कार्यक्रमात करण जोहर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, दीपिका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा आणि अन्य कलाकार सहभागी झाले होते. त्याचा व्हिडिओ ‘यू ट्यूब’वर टाकण्यात आला होता. यावरून निर्माण झालेल्या वादानंतर तो काढून टाकण्यात आला. त्यावेळीही मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेत कार्यक्रमात सहभाग झालेल्या कलाकारांना समन्स पाठवले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज