म.टा. प्रतिनिधी, मुंबई
इंडिगोच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला रविवारी पक्षी धडकला. यामुळे विमानाला मुंबईच्या विमानतळाकडे माघारी फिरावे लागले. प्रवासी मात्र सुखरूप होते.
इंडिगोचे ६ई ५०४७ हे विमान सकाळी नियोजित वेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाले. उड्डाण होत असतानाच विमानाला पक्षी धडकला. पक्षी धडकून विमान बरेच पुढे निघून गेले. त्यात विमानाच्या इंजिनाचे काहिसे नुकसान झाले. त्यामुळे वैमानिकाने विमान माघारी फिरवण्याचा निर्णय घेतला. विमान सुरक्षित खाली उतरल्यावर प्रवाशांना अन्य विमानाने दिल्लीला पाठविण्यात आले. सर्व १२३ प्रवासी व विमानातील कर्मचारी सुरक्षित होते.