म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: घाटकोपर पूर्व येथील एका नाल्यात पडून बेपत्ता झालेल्या हुसेन अब्दुल हमीद शेख या पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह शुक्रवारी नाल्यात काही अंतरावर सापडला. त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.
पंतनगर पोलिस चौकी, सावित्रीबाई फुलेनगर, गल्ली नंबर ६ येथील हुसेन हा मुलगा गुरुवारी दुपारी नाल्यात पडून बेपत्ता झाला होता. अग्निशमन दलाने हुक व दोरीच्या सहाय्याने रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध सुरू ठेवला होता. मात्र, रात्रीच्या अंधारात अपुऱ्या प्रकाशामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली होती. शुक्रवारी सकाळपासून मुलाच्या नातेवाईकांनी स्थानिक नागरिकांसोबत शोध घेतला असता, नाल्यात काही अंतरावर मुलाचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती पालिकेने दिली.