अ‍ॅपशहर

पॅरोलवर पळालेला गुन्हेगार सहा वर्षांनी सापडला

पॅरोलची सुट्टी घेऊन फरार झालेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. फारुख हसन बागवान असे या आरोपीचे नाव असून तो सहा वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता.

Maharashtra Times 21 Sep 2018, 10:00 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime


पॅरोलची सुट्टी घेऊन फरार झालेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. फारुख हसन बागवान असे या आरोपीचे नाव असून तो सहा वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता.

ओशिवरा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या हत्येच्या गुन्ह्यात फारुखला अटक झाली होती. सन २००२ मध्ये पोलिसांनी अटक करून पुराव्यानिशी त्याला न्यायालयात हजर केले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने फारुखला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. सन २०१२ मध्ये त्याला पॅरोलची सुट्टी मिळाली. मात्र, पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो तुरुंगात परतलाच नाही. त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फारुखबाबतची माहिती सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आली होती. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखाही त्याच्या मागावर होती. युनिट नऊचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने वांद्रे येथून फारुखला पकडले. कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता करून त्याला संबंधित पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज