अ‍ॅपशहर

'ते' कारगिल युद्धातील पायलट होते!

मृत्यूपुढे माणसाचं काहीच चालत नाही आणि तो कसा येईल हे सांगता येत नाही, याची प्रचिती आज मुंबईतील हेलिकॉप्टर दुर्घटनेदरम्यान पुन्हा आली. आरे कॉलनीत कोसळलेल्या हेलिकॉप्टरचं सारथ्य ज्यांच्याकडे होतं, ते प्रफुल्लकुमार मिश्रा दुसरे-तिसरे कुणी नाहीत; तर कारगिल युद्धातील एक जिगरबाज पायलट होते.

Maharashtra Times 11 Dec 2016, 3:49 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the pilot who lost his life in helicopter crash was pilot in kargil war
'ते' कारगिल युद्धातील पायलट होते!


मृत्यूपुढे माणसाचं काहीच चालत नाही आणि तो कसा येईल हे सांगता येत नाही, याची प्रचिती आज मुंबईतील हेलिकॉप्टर दुर्घटनेदरम्यान पुन्हा आली. आरे कॉलनीत कोसळलेल्या हेलिकॉप्टरचं सारथ्य ज्यांच्याकडे होतं, ते प्रफुल्लकुमार मिश्रा दुसरे-तिसरे कुणी नाहीत; तर कारगिल युद्धातील एक जिगरबाज पायलट होते, अशी माहिती समोर आली आहे.

भारतीय हवाई दलातील एक सक्षम पायलट, अशी प्रफुल्लकुमार मिश्रा यांची ओळख होती. कारगिल युद्धातही ते प्रमुख पायलट म्हणून सहभागी झाले होते. देशी-विदेशी बनावटीची अनेक हेलिकॉप्टर त्यांनी हवाई दलातील सेवेदरम्यान अगदी समर्थपणे चालवली होती. लेफ्टनंट कर्नल म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते खासगी हवाई क्षेत्रात काम करत होते. अमन एव्हिएशननं मुंबईत 'जॉय राइड' सुरू केल्यानंतर त्यांना पायलट म्हणून निवडलं होतं. आकाशातून मायानगरी कशी दिसते, हे दाखवून मुंबईकरांना, पर्यटकांना अविस्मरणीय आनंद देण्याचं काम प्रफुल्ल मिश्रा यांनाही आवडत होतं. ही 'जॉय राइड' आपल्या जिवावर बेतेल, असा विचारही त्यांनी कधी केला नसेल, पण आज ते अघटित घडलं. अर्थात, हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी बिघाड असल्याचं त्यांनी अचूक हेरलं होतं. इमर्जन्सी लँडिंगचा निकराचा प्रयत्नही केला होता, मात्र काळ आला होता आणि वेळही. त्यापुढे सगळे प्रयत्न व्यर्थ होते, निष्फळ होते.

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर १९९२ मध्ये तयार करण्यात आलेलं 'रॉबिन्सन R44' आहे. ते पवनहंसनं खासगी कंपनीला विकलं होतं. अमन एव्हिएशननं त्यात दुरुस्ती करून ते 'जॉय राइड'साठी वापरण्यास सुरुवात केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज