मुंबई: शहरात शुक्रवारी कमाल तापमानामध्ये वाढ दिसून आली. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३६.६ अंश सेल्सिअसवर तर कुलाबा येथे कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. मुंबईचे कमाल तापमान गुरुवारपर्यंत ३० अंशांच्या आसपास होते. पूर्वेकडील वाऱ्यामुळे मुंबईचा पारा चढला आहे. दरम्यान, तुलनेत कुलाबा येथील किमान तापमान २१.५ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथील किमान तापमान १९ अंश सेल्सिअस होते.
मुंबईचे तापमान ३६ पार
शहरात शुक्रवारी कमाल तापमानामध्ये वाढ दिसून आली सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३६६ अंश सेल्सिअसवर तर कुलाबा येथे कमाल तापमान ३२...
MT 16 Mar 2019, 4:00 am