अ‍ॅपशहर

निधीची चणचण नाही

मेट्रोच्या विविध प्रकल्पांसाठी जवळपास हजारो कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून त्यासाठी देशी तसेच विदेशी बँका, जागतिक बँक, त्याशिवाय जपानची वित्तीय संस्था 'जायका' आदी संस्थांकडून अर्थसाह्य मिळणार आहे. प्रकल्पांसाठी निधीची तजवीज झाली असली, तरी आणखी निधीची गरज भासलीच

Maharashtra Times 24 Nov 2018, 5:01 am
- अतिरिक्त निधीसाठी तरतूद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम there is no funding for funds
निधीची चणचण नाही


- विविध वित्तसंस्थांशी संपर्क साधून तजवीज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मेट्रोच्या विविध प्रकल्पांसाठी जवळपास हजारो कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून त्यासाठी देशी तसेच विदेशी बँका, जागतिक बँक, त्याशिवाय जपानची वित्तीय संस्था 'जायका' आदी संस्थांकडून अर्थसाह्य मिळणार आहे. प्रकल्पांसाठी निधीची तजवीज झाली असली, तरी आणखी निधीची गरज भासलीच, तर त्याकरता पैसे उभारण्यासाठी एमएमआरडीएने विविध पर्याय खुले ठेवले आहेत.

मेट्रोच्या सर्व प्रकल्पांसाठी एमएमआरडीएने विविध वित्त संस्थांशी संपर्क साधून निधीची तजवीज केली आहे. अनेक प्रकल्पात अल्प दराने कर्ज उपलब्ध झाले आहे. काही प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, महसूल प्राप्ती झाल्यानंतर कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत. त्यामुळे तशी फारशी तोशीस नाही. तरीही समजा निधीची आवश्यकता भासली, तर अनेक पर्याय खुले ठेवले आहेत.

मेट्रो मार्गिकांच्या दोन्ही बाजूस ५०० मीटरपर्यंतच्या जमिनीवर, अधिमूल्य आकारून अतिरिक्त एफएसआयची तरतूद करण्यात आली आहे. विकास शुल्कात १०० टक्क्यांपर्यंत वाढ करून आकारण्याविषयी तरतूद आहे. जमिनी व इतर स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री इत्यादीच्या नोंदणीसाठी मुद्रांकशुल्कात १० टक्के अतिरिक्त अधिभार, मेट्रो कार डेपोच्या जागेचा व्यावसायिक वापर करून मिळणारे उत्पन्न प्रकल्पासाठी वापरणे, मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या मार्गिकेत येणारे खांब, स्थानकांच्या नावाचे ब्रँडिंग, डेपो तसेच स्थानकांवरील जाहिराती व पार्किंगमधून मिळणारे उत्पन्न प्रकल्पासाठी वापरणे असे पर्याय आहेत.

विविध माध्यमांतून प्राप्त होणारा निधी हा एमएमआरडीए स्तरावर स्थापन केलेल्या 'समर्पित नागरी परिवहन निधी'मध्ये संकलित करण्यात येणार असून त्याचा विनियोग मेट्रो प्रकल्पाचे कार्य व देखभाल तसेच राज्य सरकारच्यावतीने लागणाऱ्या समभागाची रक्कम एमएमआरडीएकडे वर्ग करणे, कर्जाच्या परतफेडीसाठी निधी अपुरा पडत असल्यास त्यातून स्वतंत्र पूरक निधी म्हणून उपलब्ध करण्यात येईल.

मेट्रो प्रकल्प दृष्टिक्षेपात

प्रकल्प मेट्रो मार्ग अंतर (किलोमीटर)

मेट्रो २ अ दहिसर ते डी.एन.नगर १८.६

मेट्रो २ ब डी.एन.नगर ते मंडाळा २३.६

मेट्रो ४ वडाळा-घाटकोपर-ठाणे कासारवडवली ३२.३

मेट्रो ४ अ कासारवडवली ते गायमुख २.७

(मेट्रो ४ चा विस्तार)

मेट्रो ५ ठाणे-भिवंडी-कल्याण २३.५

मेट्रो ६ जोगेश्वरी ते विक्रोळी १४.५

मेट्रो ७ दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व १६.५

मेट्रो ८ मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट ३५

मेट्रो ९ दहिसर ते मीरा भाईंदर १०.५०

मेट्रो ९ अ अंधेरी ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ३.१७

(मेट्रो ७ चा विस्तार)

मेट्रो १० गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड ११.२

मेट्रो ११ वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १४

(मेट्रो ४ चा विस्तार)

मेट्रो १२ कल्याण-डोंबिवली-तळोजा २५

(मेट्रो ५ चा विस्तार)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज