मटा ऑनलाइन वृत्त, मुंबई
रेमंड कंपनीचे मालक, प्रसिद्ध उद्योगपती विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यात अखेर दिलजमाई होण्याचे संकेत मिळत आहेत. कोट्यवधी रूपयांच्या मालमत्तेच्या वादावर हे दोघे पिता-पुत्र एकत्र बसून तोडगा काढणार आहेत. न्यायालयाने त्यांना आपआपसात हा वाद मिटविण्याचे आदेश दिल्यानंतर या दोघांनी एकत्र बसून त्यावर तोडगा काढण्याचं मान्य केलं आहे.
हा कौटुंबीक आणि व्यक्तिगत वाद आहे. तो आपसातच सोडवा, असे निर्देश न्यायालयाने या दोघांना गेल्याच महिन्यात दिले होते. त्यानुसार सिंघानिया पिता-पुत्रांनी हा वाद आपआपसात सोडविण्याला होकार दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर विजयपत सिंघानिया यांचे वकील दिनयार मदान आणि गौतम सिंघानिया यांचे वकील जनक द्वारकादास यांनी पुढच्या आठवड्यात वादावर तोडगा काढण्यासाठी भेटायचं ठरवलं आहे. तसं या दोघांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी. एस. कुलकर्णी यांना सांगितलं आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला ठेवली आहे. त्याच वेळी जेके हाऊसच्या दोन मजल्यांवरील फ्लॅटची विक्री करू नये किंवा ते लिजवर देऊ नये, असे आदेशही न्यायालयाने रेमंडला दिले आहेत.