अ‍ॅपशहर

मुंबईतील वर्सोवा बीचवर तिघे बुडाले

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वर्सोवा बीचवर तीन मुलं बुडाल्याचं वृत्त आहे. तिघांपैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

Maharashtra Times 6 Aug 2016, 6:09 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three boys drowned on varsova beach
मुंबईतील वर्सोवा बीचवर तिघे बुडाले


मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वर्सोवा बीचवर तीन मुलं बुडाल्याचं वृत्त आहे. तिघांपैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोवा बीचवर दगडांच्या आडोशाला बसून आज दुपारी पाच मुलं दारू पीत असल्याचं ड्युटीवर असलेल्या जीवरक्षकांना आढळून आलं. जीवरक्षकांनी त्यांना तात्काळ तिथून हुसकावून लावलं. मात्र, जीवरक्षक गस्तीसाठी दुसरीकडं गेल्यानंतर पुन्हा ती मुलं तिथं आली. दारूच्या नशेतच ही मुलं पाण्यात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्यानं यापैकी तिघं बुडाली. बुडालेल्यांपैकी एकाला बाहेर काढण्यात यश आलं. त्याला तातडीनं कूपर रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथं पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. नौदलाच्या बचाव पथकाचे जवान इतर दोघांचा शोध घेत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज