अ‍ॅपशहर

अभ्यासात यश नाही, तीन भाऊ मुंबईतून बेपत्ता

बोरिवलीच्या पूर्वेकडील शांतीनगरमधील दोन सख्खे भाऊ त्यांच्या चुलत भावासह घरातून अचानक निघून गेल्याने परिसरात खळबळ माजली आहे...

Maharashtra Times 18 Feb 2018, 2:00 am
मुंबई : बोरिवलीच्या पूर्वेकडील शांतीनगरमधील दोन सख्खे भाऊ त्यांच्या चुलत भावासह घरातून अचानक निघून गेल्याने परिसरात खळबळ माजली आहे. अभ्यासात यश मिळत नसल्याने घर सोडून निघून जात असल्याने त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three brothers missing
अभ्यासात यश नाही, तीन भाऊ मुंबईतून बेपत्ता


प्रथमेश प्रमोद काळभोर (१५) आणि प्रतिक प्रमोद काळभोर (१४) हे दोघे भाऊ त्यांची आजी स्मिता यांच्यासोबत शांतीनगरमधील जनकल्याण इमारतीमध्ये राहतात. त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने आजीच त्यांचा सांभाळ करीत होती. रुग्णालयात आयाचे काम करणारी आजी रात्रपाळीला गेलेली असताना हे दोघे मागील आठवड्यात आपल्या चुलत भावासह घरातून निघून गेले. दहिसर पोलिस या तिघांचा शोध घेत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज