अ‍ॅपशहर

मुंबईत रात्री गडगडाटासह पाऊस

गेले दोन दिवस घामाच्या धारांनी भिजून गेलेल्या मुंबईकरांना आज पहाटे पावसाने गडगडाटासह येऊन सुखद धक्का दिला. मुंबई आणि उपनगरात, ठाणे, नवी मुंबईत अनेक भागांत मध्यरात्री अडीच तीन वाजण्याच्या सुमारास विजांचा लखलखाट, सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटाने पावसाने वर्दी दिली आणि मुंबईकरांची अक्षरशः झोप उडवली.

Maharashtra Times 13 Sep 2017, 10:51 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thunderstorm in mumbai at early morning
मुंबईत रात्री गडगडाटासह पाऊस

गेले दोन दिवस घामाच्या धारांनी भिजून गेलेल्या मुंबईकरांना आज पहाटे पावसाने गडगडाटासह येऊन सुखद धक्का दिला. मुंबई आणि उपनगरात, ठाणे, नवी मुंबईत अनेक भागांत मध्यरात्री अडीच तीन वाजण्याच्या सुमारास विजांचा लखलखाट, सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटाने पावसाने वर्दी दिली आणि मुंबईकरांची अक्षरशः झोप उडवली.

कोकणात काही भागात आज पुढचे काही तास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पहाटे गडगडाटासह झालेल्या पावसाची लक्षणे परतीच्या पावसासारखी होती. पण परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला केरळ किनारपट्टीलगत वाऱ्यांची द्रोणीय चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने हा पाऊस पडला. दक्षिण मध्य महाराष्ट्राला या पावसाची झळ बसेल असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला होता. गेले २ दिवस मुंबईतल्या हवेची आर्द्रता ८५ ते ९० टक्क्यांच्या आसपास पोहोचली होती. त्यामुळे मुंबईकरांची अक्षरश: काहिली झाली होती. ऑक्टोबर हिट सप्टेंबरमध्येच आल्याची चर्चा सुरू झाली होती. पहाटेच्या पावसाने मात्र या गरम वातावरणावर थोडीशी फुंकर घातली आहे.

आज हा पाऊस कोकण पट्ट्यात अधूनमधून राहणार आहे. बुधवारनंतर मात्र तो गुजरातच्या दिशेने सरकणार असल्याचे हवामान विभागाचे निरीक्षण आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज