अ‍ॅपशहर

आज मेगाब्लॉक नाही

रक्षाबंधनाच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर आज रविवारी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने रविवारऐवजी काल शनिवारी मध्यरात्री वसई आणि विरार स्थानकांमध्ये मेगाब्लॉक घेतला होता. पश्चिम रेल्वेवर वसई ते विरार दरम्यान शनिवारी धीम्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला. हा ब्लॉक मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत घेण्यात आला.

Maharashtra Times 26 Aug 2018, 6:04 am
मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no-megablock


रक्षाबंधनाच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर आज रविवारी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने रविवारऐवजी काल शनिवारी मध्यरात्री वसई आणि विरार स्थानकांमध्ये मेगाब्लॉक घेतला होता. पश्चिम रेल्वेवर वसई ते विरार दरम्यान शनिवारी धीम्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला. हा ब्लॉक मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत घेण्यात आला.

रविवारी रक्षाबंधन असल्याने त्या दिवशी लोकलला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचं रेल्वे स्पष्ट केलं आहे. मेगा ब्लॉकच्या दिवशी लोकल फेऱ्या रद्द होतात. त्यामुळे लोकल उशिराने धावत असतात. परिणामी प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. आता रक्षाबंधन निमित्त रेल्वेने मेगा ब्लॉक रद्द केल्यानं प्रवाशांची या मनस्तापातून सुटका होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज