मुंबईतील वाहतूककोंडी दूर करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गचे (कोस्टल रोड) भवितव्य आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे, समुद्रातील जैवविविधतेचे तसेच वरळी कोळीवाडा परिसरातील कोळी बांधवांचे नुकसान होत असल्याच्या आरोपाच्या पाच याचिकांवरील निर्णय मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग व न्या. नितीन जामदार यांचे खंडपीठ सुनावणार आहे. या प्रकल्पातील पुढील कामांबाबत खंडपीठाने अंतरिम आदेशाद्वारे स्थगिती दिलेली आहे.
‘कोस्टल रोड’चा आज निर्णय
मुंबईतील वाहतूककोंडी दूर करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गचे (कोस्टल रोड) भवितव्य आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात ठरणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स 16 Jul 2019, 6:13 am