अ‍ॅपशहर

आजचा सूर्योदय नवा इतिहास रचतोय: सुप्रिया सुळे

'आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार राज्यात येतंय. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करू,' अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2019, 9:20 am

उद्धव यांचा आज शपथविधी; काँग्रेसचे मुख्यमंत्री येणार

मुंबई: 'आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार राज्यात येतंय. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करू,' अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Supriya-Sule



शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी आज सायंकाळी शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सत्तास्थापनेच्या संपूर्ण घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण आहे. सुप्रिया सुळे यांनी आज केलेलं ट्विट याचंच निदर्शक आहे. भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे. 'आजचा सूर्योदय नवा इतिहास रचणारा आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येत आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यानिमित्तानं त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सर्वांनी मिळून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात सामील होणार नाहीत?

तब्बल महिनाभरानंतर होऊ घातलेला शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा शपथविदी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अचानक केलेल्या बंडामुळं रखडला होता. या बंडामागे सुप्रिया सुळे यांचं पक्षात वाढत जाणारं प्रस्थ कारण होतं, अशी चर्चा होती. त्यामुळं गेला महिनाभर सुप्रिया सुळे चर्चेत होत्या. अजित पवारांच्या बंडामुळं केलेल्या भावनिक ट्विट्समुळं त्यांच्या नावाची चर्चा वाढत गेली. मात्र, सुप्रियांच्या मुख्यमंत्रिपदाचा काही प्रश्नच नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर ही चर्चा थांबली. कालांतरानं अजित पवार यांचं बंडही शमलं आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं. सुप्रिया सुळे यांना हा आनंद लपवता आला नाही.

मुख्यमंत्रिपदाचे प्रलोभन हा घोडेबाजारच: अमित शहा

नव्या आमदारांच्या काल झालेल्या शपथविधी सोहळ्याच्या वेळी सुप्रिया सुळे यांच आकर्षणाच्या केंद्रबिंदू होत्या. घरचा कार्यक्रम असावा अशा तऱ्हेनं विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर उभं राहून त्या प्रत्येक आमदाराचं स्वागत करत होत्या. अजितदादांचीही त्यांनी गळाभेट घेतली. त्यांच्या या सरबराईची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती.

शिवाजी पार्कात ही प्रथा नको: मुंबई हायकोर्ट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज