अ‍ॅपशहर

प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांचं निधन

गेली अनेक वर्षे आपल्या कसदार अभिनयानं टीव्ही मालिका व चित्रपटांबरोबरच रंगभूमी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते 'पद्मश्री' टॉम अल्टर यांचं शुक्रवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. अल्टर हे त्वचेच्या कर्करोगानं ग्रस्त होते. त्यांचा हा विकार बराच बळावला होता. त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Maharashtra Times 30 Sep 2017, 7:13 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tom alter padma shri actor and writer dies aged 67
प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांचं निधन

गेली अनेक वर्षे आपल्या कसदार अभिनयानं टीव्ही मालिका व चित्रपटांबरोबरच रंगभूमी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते 'पद्मश्री' टॉम अल्टर यांचं शुक्रवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. अल्टर हे त्वचेच्या कर्करोगानं ग्रस्त होते. त्यांचा हा विकार बराच बळावला होता. त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

अल्टर यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच टॉम अल्टर यांना मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कर्करोग असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं होतं. मात्र, त्यांचा हा विकार खूपच बळावला होता. त्यामुळं उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी त्यांचे कुटुंबीय व जवळचे नातलग त्यांच्यासोबत होते.

पुण्यातील एफटीआयआयमधून १९७४ साली सुवर्ण पदकासह पदवी मिळवलेल्या टॉम अल्टर यांनी ३००हून अधिक चित्रपटांत काम केलं होतं. अनेक टीव्ही मालिकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. नव्वदच्या दशकात दूरदर्शनवरील 'जुनून' या मालिकेत त्यांनी साकारलेली गँगस्टर केशव कलसीची भूमिका बरीच गाजली. अभिनयाशिवाय अल्टर यांनी दिग्दर्शनही केलं होतं. १९८० ते ९०च्या कालावधीत त्यांनी क्रीडा पत्रकार म्हणूनही काम केलं होतं. सचिन तेंडुलकर यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्हीसाठी त्याची मुलाखत घेणारे ते पहिले पत्रकार होते. अल्टर यांनी तीन पुस्तकंही लिहिली आहेत. चित्रपट व कलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल २००८मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज